STORYMIRROR

Sharda Malpani

Inspirational Classics

3  

Sharda Malpani

Inspirational Classics

वेध स्त्री मनाचा.

वेध स्त्री मनाचा.

6 mins
14K


वेध स्त्री मनाचा या जगात

कुणाला कधी लागणार का

कोमल हृदय असावे लागते

तरच तिच्या वेदना कळणार. 


माता, भगिनी, पत्नी, सून, मुलगी

अनेक नात्याचे पदर उलगडते

ठाव घेते प्रत्येकाच्याच मनाचा

संसार सुख समाधानाचा करते. 


कधी कामिनी कधी रणरागिणी 

तर कधी बनते झाशीची राणी

कधी बनते ती सौदामिनी 

अशीच असते सहचारिणी. 


त्याग, सहनशीलता धरणीची 

ममत्व, वात्सल्याची मूर्ती असते

तिच्या अस्तित्वानेच तर तुमच्या 

घराला घर पण येत असते. 


गृहिणी म्हणून तिला हिणवू नका

जाणावे तिच्या कष्टाचे मोल

वेध घ्या स्त्री मनाचा तुम्ही 

जीवनात साधा समतोल. 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational