STORYMIRROR

Rekha Kulkarni

Romance

3  

Rekha Kulkarni

Romance

वेडी प्रित तुझी

वेडी प्रित तुझी

1 min
323

सख्या अशी कशी वेडी प्रीत तुझी,

तुझी न माझी जोडी जन्मांतरीची.

काटा पायी माझ्या अश्रू तुझ्या डोळा ,

डोळा पाणी येता प्रीत कळायची.....1


प्रिया सजना रे जाऊ दूर देशी ,

दूरदेशी जाता हात घेऊ हाती .

एकरूप दोघे मनी फुले प्रीत ,

प्रीत फुला वाती तू आणि मी ज्योती.......2


प्रणय भाव जागवी प्रीत वेडी ,

वेडी मी ना कळले कधी ईशारे

वेडेपणाचे प्रित असते नाव ,

नाव ओठी ये तुझे मन शहारे.....3


जीवनी तू मला साथ दे ,हात दे ,

दे मला प्रीत गंधित गीत माझे .

सांजसमयी दे वचन तू मला ,

मला दे तू आठवाचे क्षण माझे ....4 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance