वचन
वचन
*'वचन'*
वचन
आकाश भेटीचे
धरतीला मृगजळासम प्रतीक्षेचे
सदैव अपूर्ण क्षितिज आभासाचे
वचन
सरकारी योजनांचे
भ्रष्टतेने लालफितीत अडकणारे
शेतकरी हताश प्राण लटकवणारे
वचन
प्रासंगीक कराराचे
पैशात तोलून सांधणारे
करार पूर्ण करण्यास बांधणारे
वचन
निर्व्याज प्रेमाचे
स्वार्थापासून दूर असण्याचे
निखळ अबोध प्रीत बंधनाचे
