STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

वाऱ्याची झुळूक तू

वाऱ्याची झुळूक तू

1 min
699

वाऱ्याची झुळूक तू

हळूच फुंकर मारशील का?

माझी तू होशील का?


दोन प्रेमाच्या गोष्टी तू कर

दोन प्रेमाच्या गोष्टी मी करतो

आपल्यामधले प्रेम हे असेच वाढू दे

सांग तू माझी होशील ना?


पहिल्या पावसातली पहिली सर 

दोघांनी एकत्र अंगावर घेऊ

पावसात मस्त दोघंही भिजू

पावसाचा हा आनंद घ्यायला

सांग ना तू माझी होशील ना?


दोघांनी मिळून आपला संसार छान करू

हे राणी तू मला आयुष्यभर साथ देशील ना?

सांग ना तू माझी होशील ना?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance