ऊठ सावित्री ऊठ
ऊठ सावित्री ऊठ
ऊठ सावित्री ऊठ, तुलाच लढायचे आहे
समाजातल स्थान तुलाच टिकवायच आहे
रोजचंच तर घरदार, रोजचीच तर चाकरी
जन्मल्यापासूनच करायची कुणाची ना कुणाची चाकरी.
या सगळ्या फेऱ्यातून, तुलाच बाहेर पडायचं आहे.
ऊठ सावित्री ....
संसार संसार म्हणून, राबराब राबायच
प्रत्येकाची मन सांभाळत, स्वतःच मन मारायचं.
तुला सुध्दा ग मन आहे हेच आता दाखवायच आहे .
ऊठ सावित्री ....
घरी थांबलं तर आयत खाते, नोकरी केली तर माज करते.
घरीदारी राबून सुध्दा तुझ्यातली सावित्री अपमानित होते.
तुझ्यातला स्वाभिमान तुलाच आता जागवायचा आहे .
ऊठ सावित्री ....
.....जोतिबांची सावित्री ऊठली, शिक्षणाची क्रांती झाली.
कर्मवीराची लक्ष्मी ऊठली, दिनदलितांची पोरं शिकली.
तुझ्यातली सावित्री, तुलाच आता ऊठवायची आहे.
एकविसाव्या शतकातला नवा इतिहास लिहायचा आहे.
ऊठ सावित्री ....
