उंच उडू या
उंच उडू या
अजून थोडे उंच उडू या
पंख असे सैल करू या
एकेक चांदणे पुरे आता
चल आकाशी उंच उडू या
पहाट तारा चमचमतो आता
दवबिंदूचे गवतावर बिंदू
चकोर पिते चांदणे रात्रीचे
चल आकाशी उंच उडू या
पुनवेची रात अजूनही आहे
चमचमती मनात प्रेमाचे तारे
नयनी अजूनही बंद कळी
चल आकाशी उंच उडू या
रोमरोमी फुलवी पिसारा
गुलाबी झाली ही दुनिया
चल दोघे घेऊ विसावा
चल आकाशी उंच उडू या

