उधळण रंगाची
उधळण रंगाची
आयुष्यात असतात अनेक रंग
प्रत्येक क्षणात आपल्या संग
कधी करतात अपेक्षांचा भंग
कधी होते जीवन तंग
करतात ते सुखाची उधळण
कधी मायेची पखरण
दावितात कधी जीवनाची उतरण
तर कधी प्रगतीची चढण
जपलं या रंगांना
तरच साकारेल जीवनी इंद्रधनु
जाईल क्षणात रडू अन उमटेल हसू
