STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

तू येशील ना....

तू येशील ना....

1 min
183

तू येशील ना.....

पावसा सोबत खेळायला

तू आल्यावर पाऊस 

जोरात येतो

तुला छेडत असतो

तू आडोसा घेत असते

तो तुझ्या मगे पळत असतो

तू चिंबचिंब भिजताना 

तो तुला कवेत घेत असतो


तू येशील ना.....

कळ्यांना कवेत घ्यायला

त्या कळ्यांना तुला बघायच असतं

तुझ्या स्पर्शाने

फुलायच असतं

त्यांचा लडिवाळा पाहून

तू गोडं हसतं असते

गजरा फुलांचा माळत असते


तू येशील ना....

बाग फुलांचा बघायला

तुला पाहून फुले फुलत असतात

परडीतल्या परडीत 

ते भांडत असतात

गंध फुलांचा दरवळताना

तू वेडावत असते

तू सडा फुलांचा वेचत असते


तू येशील ना

शृंगार तुझा आरशात

पहायला

 रूप तुझं लाजरं 

त्याला डोळ्यात बंद करायचं असतं

तुला पाहून मंत्रमुग्ध व्हायच असत

तू बट केसांची मागे घेवून

 पहात असते

गालावरची खळी हसताना

खुप सुंदर दिसते


तू खरचं येशील ना......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance