तू पाऊस होऊन ये
तू पाऊस होऊन ये
तू पाऊस होऊन ये..
रिमझिम श्रावण सर होऊन ये
वादळ वाऱ्यासह गरजत ये
माझ्या मनाला सुखवून दे...
तू..काळ्याकुट्ट नभांना भेदून ये..
जे जे मला नकोसे ते ते वाहून ने..
माझ्या मनाचे आभाळ लख्ख करून दे...
तू पाऊस होऊन ये...
तू..सोबत चैतन्याचे वारे घेऊन ये
जमले तर थोडे चैतन्य मला ही दे
गंध मातीचा मनात दरवळू दे
तू..पाऊस होऊन ये
तू..मरगळल्या माझ्या मनास संजीवनी दे
रोमारोमात नवा जोश, उत्साह दे
जगावे असे काहीतरी जीवनात दे
तू..पाऊस होऊन ये...
तू..नसताना झाली माझी होरपळ
तूच आता ती शांत कर
वैशाख् झालेल्या जगण्याला
श्रावण करून दे
तू..पाऊस होऊन ये

