तू मला भेटली
तू मला भेटली
तुला पाहिले मी सांज ही ढळतांना
तू मला भेटली काळीज हे छळतांना
वाटले होते आता
भेट होणार नाही
तुझ्या माझ्या प्रेमाची
समेट होणार नाही
काल होतो अंधारात क्षण मोजतांना
तू मला भेटली काळीज छळतांना
तिने पाहतांना
वेड लावले असे
दिस ओलांडून गेला
आता दार हे लावू कसे
वाट पाहिली मी चंद्र हा लपतांना
तू मला भेटली काळीज छळतांना
दूर दूर चांदण्यात
काजव्यांची मैफिल
तुझ्या आठवणींचा
माझ्या स्वप्नांत काफिल
स्वप्नाशी नाते माझे तुझे जुळतांना
तू मला भेटली काळीज छळतांना
सैल भासले मला
का प्रेम तुझे माझे
जवळ आलीस की
उतरेल मनाचे ओझे
जवळ आलीस तू जखम भळभळतांना
तू मला भेटली काळीज छळतांना

