तू म्हणजे पौर्णिमा
तू म्हणजे पौर्णिमा
काय असेल तुझ्या सुंदरतेच रहश्य
त्या देवालाच माहीत
पण तुला बघण्यासाठी सोनेरी पहाटही
तुझी वाट बघत असते
आणि तुला पाहिल्याशिवाय
फुलेही उमलत नाही
त्या जाईजुई मोगऱ्याच्या
फुलांनाही गजरा होवून
तुझ्या वेणीवर खुलायच असतं
त्या गजऱ्यामुळे तू आणखीनच सुंदर दिसते
म्हणून गजराही तुझ्याच आठवणीत असतो
त्या कळ्यांनाही तुझ्या नाजूक बोटांचा स्पर्श हवा असतो
तुझ नटनं मुरडन बघून त्याही लाडावतात
आणि तुझ्या कवेत येण्यासाठीच त्या उमलतं
असतात
तुझ ते अलवार हसणं
आणि गालावयची लाजणारी ती हळवी खळी
सार काही नजरेला खुणावत असतं
तू आहेसच सुदंर
चांदण्यांच्या गर्दीत शोभून दिसणारी
म्हणून तू नजरेआड होवूच नये अस त्या आरशालाही वाटते
एकदातरी तू दिसावी म्हणून अंधारात चमकणारे काजवेही
तुला शोधत असतात
खरचं तू खुपच सुदंर आहेस
कसं कराव तुझ्या सौदर्याची तारिफ
तू म्हणजे पौर्णिमाच.....

