STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy

2  

Pratik Kamble

Tragedy

तू झोप रे झोप निष्ठुरा

तू झोप रे झोप निष्ठुरा

1 min
824


तू झोप रे झोप निष्ठुरा...

तुला जाग यायची नाही...


झिझवले उंबरठे तुझे..

तुझी माया पाझरायची नाही...


मनात रे का पुजू मी तुला...

जर मुभा नाही मला..

तुज्या गाभाऱ्यात यायची..


कशाला रे बांधलीत कोणी..

देवळे इथे कोण्या देवीची...

तिलाही काळजी वाटत असेल आता तिच्या अब्रूची...


अरे सगळ्याचा तु करता करविता म्हणे..

मग ही अबरूची लक्तरे तोडण्यात

तुझी बांधीलकी नाही का म्हणायची..


मरतो रे माझा माय बाप शेतकरी...

तुला त्यांचीही किव नाहीच की म्हणायची..


इथे जाती जातीत होतो रक्तपात...

तू सांग तुझी जात तरी कुठली..?


आणि सांग तुझा ठीकाणा मी येतो तुझ्या भेटी...

देवळातली दगड काही बोलत नाही..

का तुझी दातखिळी बसली म्हणायची...


तुझ्या नावाखाली कसा रे खपवून घेतो...

तू नंगानाच वासनेचा...

की तुलाही....


ही रिकाम्या डोक्याची...बिनाकामाची...

तुझी आंधळी पिलावळ आहे ना..

तिला तुझ्यावरली टीका सहन होत नाही म्हणे...


अरे तू तरी का अंत पाहतो..

की नाहीच तुझ्यात धमक..

स्वतःच अस्तित्वही सिद्ध करण्याची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy