STORYMIRROR

Umesh Salunke

Romance

3  

Umesh Salunke

Romance

तू इतकाही दूर जाऊ नकोस

तू इतकाही दूर जाऊ नकोस

1 min
272

तू इतकाही दूर जाऊ नकोस

माझं मन मला त्रास देत राहील.


प्रेमाच्या नात्याला डाग लागू नये

एवढं जपलं आहे त्याला कुणी

आपल्या असणाऱ्या एकतर्फी

विश्वासाला काडी टाकू नये.......!


तू इतकीही दूर राहू नकोस की

माझं मन संशयाचं जाळं होईल.....


तुझं माझ्यावर प्रेम असताना 

दुसरीकडे जाऊ नये एवढी 

तू काळजी घे म्हणजे झालं.....


खरंच तू माझ्या मनात असणाऱ्या

नात्याला शेवटपर्यंत टिकवलं 

त्यातच माझं सगळं प्रेम आलं.......


तू इतकाही गहाळ राहू नकोस की

तू माझ्यापासून हिरावून जाशील......

तू इतकी ही नादान होऊ नकोस की

तुझ्यावर असणारं प्रेम कमी होईल.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance