तू आणि मी
तू आणि मी


तु स्पर्श
मी तुझ्या स्पर्शाचा रंग,
तु विरह
मी तुझ्या विरहाचा चंद्र,
तु विरलेला धागा
मी तुझं जुळलेल नातं,
तु प्रेम
मी तुझ्या प्रेमावरचा विश्वास,
तु स्वर प्रेमाचा
मी तुझ्या प्रेमाची ताल,
तु आयुष्य
मी तुझ्या आयुष्याची ओळ,
तु कविता
मी तुझ्या कवितेचा अर्थ,
तु ओली माती
मी त्या मातीचा सुगंध,
तु माझ्यासह पूर्ण
मी तुझ्याविना अपूर्ण...