तू आणि मी
तू आणि मी
मनातल्या भावनांचा सागर तू ,
आणि भवसागरच्या किनारा मी
सागरच्या लाटांची चंचलता तू ,
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी |
हृदयाच्या गतीचा आलाप तू ,
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू ,
आणि हिराच्या प्रकाश मी |
फुलाच्या गाभ्यातला सुगंध तू ,
आणि सुगंधाचा श्वास मी
श्वसांची ताल तू ,
आणि तालांचे ऐक्य मी |
तुझे अमोल स्वप्न मी
आणि माझे स्वप्नमोल तू ,
जसं पाण्याचा थेंब ,
आणि थेबातले पाणी
तसं माझ्यातला तू ,
आणि तुझ्यातला मी |

