STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
187

तू आणि मी

एकसारखं पहाण

शक्यच नाही मला

तुझ्यापासून वेगळ होणं


तू आणि मी आहोतच

 एकमेकांसाठी

म्हणून जुळल्यात ना

तुझ्या माझ्या 

आयुष्याच्या गाठी


तुझं माझ एक होण

यात काहीच नाही 

जगावेगळ  

तू आणि मी एक होण

यातचं आल ना सगळं


तू आणि मी

एकमेकात एक 

होवून जायचं

एकमेकांना

 एकमेकात पहायचं


 बघना

 तुझ्या गालावरची खळी

कसं मला खूणवते

तू आणि मी

एकत्र होण्यासाठी

किती गोडं हसते


तू आणि मी एक झाल्यावर

चंद्र धावतच येईल

तुला मला एकत्र पाहून 

पौर्णिमा काळोखात जाईल


आता खूप झाल हं 

 तुझं हे वागणं

बरं नाही तुझं 

बट केसांची मागे घेवून

एकसारखं बघणं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance