तुला पाहता........
तुला पाहता........
तुला पाहता
चेहऱ्यावर हसू उमलते
तुला पाहता मनास या
शांततेची जाणीव होते
चंचल माझ्या मना जणू
हक्काचे घर मिळते
तुला पाहता
वाटे सारे होईल शक्य
न सुटणारे कोडे देखील
क्षणात सुटावे
तू आहेस माझ्यासोबत
माझ्या सुखात
अन् आहेस माझ्यासोबत
दुःखात माझ्या साथीला
तू असता सोबत माझ्या
बाळ येते मजला
अन् तुला पाहता
विखुरलेल्या शब्दांना
मिळते स्वरूप कवितेचे

