मित्र कसा असावा?
मित्र कसा असावा?
1 min
268
मित्र कसा असावा?
आपली खोडी काढून हैरान करणारा
पण कोणी आपल्याला त्रास दिला तर त्याची खोड मोडणारा
वाटेल त्या मुलाला दाजी बनवणारा
पण कोणत्या मुलांनी त्रास दिला तर त्याला अद्दल घडवणारा
सदा सर्वदा वायफट बडबड करणारा
अन् गरजेच्या वेळी अगदी उत्तम सल्ला देणारा
चोवीस तास चेहऱ्यावर हसू असणारा
पण खूप दुःख झाले तर आपल्या समोर मन मोकळे करणारा
विनाकारण पार्टी मागणारा
अन् कधीतरी चुकून आपल्याला पार्टी देणारा
नेहमी लहान मुलासारखे वागणारा
पण कठीण प्रसंगी सर्वात जास्त समजूतदारपणे वागणारा
मित्र कसा असावा?
असा प्रश्न पडताच तू डोळ्यासमोर यावा
कारण मित्र हा अगदी तुझ्यासारखाच असावा
