तुला जपणार आहे
तुला जपणार आहे
इतकीच करते
मी त्याच्यावर प्रीत
नकळत उतरतो कागदावर
जेव्हा मी लिहित असते काही कवितेच्या वहीत
त्याच्याशिवाय नाही कुणी
माझ्या मनात
लवकर येऊ दे देवा
हे तरी त्याच्या ध्यानात
त्याचं प्रेम मला दिसतं
त्याच्या पाणीदार डोळ्यांत
मनाला खूप आनंद होतो
तो दिसता मला कोणत्या लग्नसोहळ्यात
एवढीच करते मी त्याच्यावर प्रीत
आयुष्यभर जपेल मी नाव त्याचं
माझ्या कवितेखालच्या सहीत
असंच त्याला जपेल मी माझ्या मनात
