Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mayuri Thorat

Others

5.0  

Mayuri Thorat

Others

अभिवादन

अभिवादन

1 min
502


 तू खूप खस्ता खाऊन,अंगावर दगड माती झेलून   

  ज्या दिवशी आम्हा मुलींसाठी शिक्षणाची दार उघडली

  त्याच दिवशी वर्मी घातला तू घाव इथल्या

  सनातनी सडक्या कुजक्या मानसिकतेवर…..

बा,

  तुझ्या ओंजळीतून तू शिक्षणाचा आभाळभर दान 

  तू माझ्याफाटक्या पदरता टाकलं...

  शिक्षणा मुळे माझं जीवन सुख समृध्दीने व्यापल

  तरी ह्या समाजाने महापुरुषांना जाती जातीत वाटलं…..

बा,

  शिक्षणाचा माहेरघर म्हणणाऱ्या शहरात मी

  आज तुझ्याच कृपेनं शिक्षण घ्यायला जाते...

पण दोन पावलांवर असणारी तुझी शाळा सोडून

  लांब लचक रांगेत उभे राहून मी गणपतीच दर्शन घेते…..

बा, 

  नंतर माहिती पडत कीं ह्याच परिसरात तू 

  दगड माती झेलून माझ्यासाठी एक शाळा काढली होती..

  माझ्या शिक्षणाची बीजे तू इथेच कधीकाळी इथेच पेरली  होती आज तू रोवलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला .....

बा,

   त्या इमारती कडे पाहिल्यावर कळतो ,तुझा संघर्षमय प्रवास,

तुझ्या जयंती ला पुण्यतिथी ला तुझ्या जवळ आल्यावर  जाणवत की म्हणतोय जणू कळवळा करून की इतिहास वाच

बा,

एक सांगू, मी तुझा इतिहास वाचत नाही मी फक्त तुला जयंती अन पुण्यतिथीलाच आठवतो तुझे विचार नाहीं रे अंमलात आणत..

फक्त एकमेकांना तुझा फोटो पाठवून शुभेच्छा पाठवतो...

बा,

  शिक्षणाचा देव आहेस तू पण ह्या जगात खर्याला लवकर किंमत भेटत नाही ,,मला खंत आहे मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणार्या माझ्या बा ला ,,,

अजूनही का भारतरत्न भेटत नाही,,,✍️✍️


 शिक्षणाचे मळे घरोघरी फुलावेत म्हणून राष्ट्रकार्याची धुरा तेवत ठेवणाऱ्या महान महात्म्याचा स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏



Rate this content
Log in