तुजसवे...
तुजसवे...
चांदण्या रात्री तुजसवे फिरावे
मंद - मंद तारकांनीही गाली हसावे....
हाती घेऊनि हात तुझा दूरदूर चालावे
थोडा अबोल तू थोडी अबोल मी राहावे....
परी स्पर्शानेच सारे तुला कळावे
डोळ्यातील भाव माझ्या तुझ्या हृदयास समजावे....
शुभ्र चांदण्या अन तेजस्वी चंद्रही
गार-गार वारा मंद वाहत राही.....
प्रितीत धुंद तू अन धुंद मीही आज व्हावे....
चांदणीने जणू आज चंद्रास बिलगावे....

