STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

तुझ्यावरही●●

तुझ्यावरही●●

1 min
196

आज तुझ्यावरही एखादी 

कविता लिहावं म्हणलं

शब्दात माझ्या आज तुलाही

थोडं स्तब्धपणे बसवून बघावं म्हणलं..


विचार केला थोडा 

माझ्या कवितेत तू पाहून तुला

तू रागावशील का ग मला..


तुझ्यावर आज का कविता केली मी

कोणी विचारलंच जर मला

तर मी हसत हसत उत्तर देईन त्याला

तू आवडली ग मला..


स्वप्नात माझ्या तू

आज आली होती जरा

कवेत घेऊन तुझ्या तू उठवली होती मला..


सकाळचं स्वप्न हे खरं होतंय म्हणे

मैत्रीत ही पुढे चालून प्रेम होतंय म्हणे

तो स्वप्नातला सीन पुन्हा आठवला आज मला

मग तुझ्यावरही एखादी कविता 

लिहावं म्हनलं जरा..


माझ्या कवितेचा विषय होतीस आज तू

गालातच आलं मलाही थोडं हसू

लेखणीने केलं तुझ्या रुपाचं वर्णन

अन शब्द झाले जणू तुझे एक-एक विभूषण..


कवितेला आला होता आता

तुझ्या हातावरील मेहंदीचा रंग

मी ही पाहून तुला कवितेत माझ्या

आज झालो फार दंग... आज झालो फार दंग...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance