तुझ्यात मन गुंतले
तुझ्यात मन गुंतले
बघता तुला सख्या
गुंतले तुझ्यात मन
तुझ्या प्रेमाने भरलाय
हृदयातील कन अन् कण.......! १ !
सोबत तुझी असता
प्रत्येक क्षण सुखी
बघता तुलाच येई
गोड हास्य मुखी..................! २ !
जेव्हा जेव्हा बघते तुज
प्रत्येक क्षणी प्रेमात पडते
अनमोल अशी प्रीत आपली
तेव्हा सर्वांमुखी जडते...........! ३ !
तुझ्यात मन गुंतले
नको आता काही
तुझ्या माझ्या प्रेमाशिवाय
जीवनात काही नाही...........! ४ !
निरंतर अशीच आपली
बहरत राहावी प्रीत
तुझ्यात गुंतूनी मी असेच
गात राहील प्रेम गीत.........! ५ !
