विरह
विरह
सख्या असह्य झालय
तुझ्याविना आता मला
आठवण येते तुझी
नाही कळत का तुला.....!!१!!
तुझ्या एका भेटीसाठी
तळमळे माझे मन
लवकर येना सख्या
आण भेटीचा तो क्षण.....!!२!!
झाले हे मन व्याकूळ
राहावत नाही आता
वाटेवर नजर ही
केव्हा भेटायला येता.....!!३!!
नको आता हा विरह
तळमळ रे भेटीची
लागलीया मना आस
तुझ्या एकाच मीठीची.....!!४!!
तुझ्या कुशीत शिरून
दिवास्वप्ने बघायची
मिलनाची एक रात्र
प्रेमाने सजवायची........!!५!!

