STORYMIRROR

Ankita Navlakhe

Others

3  

Ankita Navlakhe

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
219

आठवतो सख्या आजही

तो पहिला पाऊस

दोघांनाही भिजण्याची

किती होती हौस..........!!१!!


रिमझिमत्या पावसानेच सख्या

जोडली आपली प्रेम जोडी

तू आलास जीवनात, अन्

जगण्यात आली गोडी....!!२!!


काय करू वर्णन

त्या पहिल्या पावसाचे

तुझ्या उबदार मिठीतील वाटे

प्रत्येक क्षण नवसाचे......!!३!!


ती शितल रात्र अन्

त्या पावसाच्या सरी

न व्यक्त होणाऱ्या भावना

किती दाटल्या होत्या उरी...!!४!!


आज ही हवा वाटतो

तो पहिल्या पावसातील क्षण

तुझ्या उबदार मिठीत 

किती स्थिर होते मन........!!५!!


Rate this content
Log in