तुझ्याचमुळे रे सखा
तुझ्याचमुळे रे सखा


तुझे सोडून जाणे
नको वाटते रे
सोबत तुझ्या प्रेमाची
खूप गोड असतेे रे
कंठ दाटूूून येेतो जेव्हा
निरोप तुुला देेताना
सरून जातो दिवस
रूप तुुुझे न्यहळताना
राहुन दारात उभी
वाट तुुुझी बघते
तुझ्याशिवाय घरात
सुख कुुठे असते
रूसुन बसले तुझ्यासाठी
मनवायला कधी येेशील
विरहात थकलेत डोळे
भेटायला कधी येेशील
तुझ्याचमुळे रेे सखा
आयुष्याला अर्थ आहे
तुझ्याशिवाय जगणे माझे
सारेच व्यर्थ आहे