STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance Others

2  

Sagar Jitendra Bangar

Romance Others

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी

1 min
86

फुलांच्या पाकळी-पाकळीतही

प्रितीचे भाव आहे

पानाआड लपलेल्या दवबिंदुतही

स्वप्नांचे गावं आहे


प्रभात किरणांनी चमकतो बिंदू

मोती खरे भासतात

तुझ्या डोळ्यातील अश्रुंनाही

प्रकाशनासाठी वाव आहे


प्रित शिकवली तू झाडांना

त्यांनाही मन होते

आनंदी दिसले ते सदैव

त्यांच्या काळजातही घाव आहे


प्रहार केला तू फांद्यांवर

वेदना मुळांना होतात

पाना पानातील अश्रुंचा

मातीत रुजण्यास ठाव आहे


पडलेल्या अश्रुंना मी

उरी आजही जपून ठेवले

तुझ्या प्रत्येक शब्दा शब्दाला

माझ्या कवितेचे नाव आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance