STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

तुझी याद आली

तुझी याद आली

1 min
243

अशी अचानक आज प्रिये का तुझी याद आली


गंधित वेडा अनिल सारा असा कुठे हरवला 

पारिजात तो तुझ्या वनीचा कधीच रे मावळला 

तरी कसे घन बरसले मनातल्या आभाळी

अशी अचानक आज प्रिये का तुझी याद आली


तुला उमगली परी न कळली, अबोल माझी प्रीती

मज हून तुजला दूर खेचते, सुप्त कोणती भीती

वेळ लोटला सांजेस किती, रात्र अजून ना झाली

अशी अचानक आज प्रिये का तुझी याद आली


रोज निशेला स्वप्न भेटते नव्या जीवनाचे 

आज मजला वेध लागती पुन्हा मीलनाचे

प्रीतगंध सांडले सुखांनी सुरेल संध्याकाळी 

अशी अचानक आज प्रिये का तुझी याद आली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance