STORYMIRROR

VINAYAK PATIL

Romance

4  

VINAYAK PATIL

Romance

तुझी माझी जोडी

तुझी माझी जोडी

1 min
251

तुझी माझी जोडी सख्या 

मज वाटे राजाराणी 

गाऊ सुखी संसाराची 

अशी गोड गोड गाणी ||१|| 


तुझी माझी जोडी सख्या

जणू राधा आणि कृष्ण 

राहू आपण अगदी

इथे गुण्यागोविंदानं ||२|| 


तुझी माझी जोडी सख्या 

जणू राम आणि सीता 

जाऊ वनवासी दोघे

वाचू भगवदगीता ||३|| 


तुझी माझी जोडी सख्या

जणू शंकर-पार्वती 

जाऊ कैलासी मिळून 

करू देवाची आरती ||४|| 


तुझी माझी जोडी सख्या

असती साता जन्माची 

जन्मोजन्मी मिळो तुम्ही

करीतो पूजा वडाची ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance