STORYMIRROR

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance

3  

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance

तु आणि मी

तु आणि मी

1 min
355

कसं ना रे राजा तुला माझ्या 

मनातलं सारं काही कळतं.... 


मन भावनांच्या चक्रव्युहात 

अभिमन्यूसारखं अडकतं.....


नात्यांच्या गुंत्यात वेडं मन

भावनिकतेने पुन्हा गुंततं.....


मी अडकते अशा नात्यांत

आणि मन माझं गुदमरतं


कुठे जीव लावावा इतकं

मला तरी कुठे रे कळतं...


तुझ्या साथीने मतलबी जग

आता कुठे थोडं थोडं उमगतं


सावरतोस तु मला नव्याने

हे माझं मलाही समजतं.....


मी ही चुकते तरी तुझं कुशीत

घेऊन समजावणं आवडतं



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance