STORYMIRROR

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Others

3  

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Others

बघ तुला जमतंय का..

बघ तुला जमतंय का..

1 min
232

माझी वाट पाहून तर बघ..

छान आठवण बनून येईन ,


काही गुणगुणून तर बघ..

गाणं बनून ओठांवर येईन


मनात थोडं आठवून तर बघ ,

गाली गोड हास्य बनून येईन


तु छान आयुष्य जगून तर बघ,

तुझं जीवनगाणं बनून जाईन


कधी तरी साद देऊन तर बघ

प्रतिसाद बनून धावत येईन


ह्रुदयाच्या कप्प्यात ठेवून बघ 

तुझं ह्रदयच होऊन राहीन


Rate this content
Log in