STORYMIRROR

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance Others

3  

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Romance Others

कसं सांगू तुला..

कसं सांगू तुला..

1 min
369

कसं सांगू तुला

मन माझं का झुरतं

तुझ्या हास्याची लकेर

त्याची ते वाट पाहतं


मोकळे सोडून केस

दवबिंदूचा शिडकावा तो

अजूनही चेहरा माझा

त्याचीच वाट पाहतो


सुंदर म्रुदु करतल अन्

जाळं गुंतलेल्या बोटांच

माझी बोट अन् हात तो

त्या म्रुदुतेची वाट पाहतो


किती किती बरं सांगू तुला

कसं कसं बर समजावू

माझ्या मनीच्या यातना

समजण्याची वाट पाहतो



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance