STORYMIRROR

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Others

4  

सौ. वर्षा विशाल ठुकरुल

Others

प्राजक्त

प्राजक्त

1 min
499

माझ्या ओंजळीतल्या

प्राजक्त फुला 

तु श्वासांतून ह्रदयात

केव्हाच पोचलास

आता शरीर ही सुगंधीत

त्या वासाने

आसमंतात या मला

फक्त तुझाच भास

तु ही वेडा त्या

प्राजक्ताच्या वासाचा...

अन् मी तुझीच वेडी..

सखया रे खास

तु सुगंध त्या फुलाचा

देठाचा मी केशरी रंग

प्रेमाच्या हिंदोळ्यावर

मी तुझ्यासवे दंग

जन्मोजन्मींच नात

हे असंच फुलावं..

प्राजक्त कोमजण्याआधी

तु अलगद झेलावं..


Rate this content
Log in