STORYMIRROR

Anju Metkar

Classics

3  

Anju Metkar

Classics

तृप्त मी...

तृप्त मी...

1 min
282

दाटले भाव वेडे

नेणिवांचे अंतरी

काजव्यांच्या झगमगाटी

जाणीवांचे स्वप्न उरी ।।१।।


भावबंध नात्यांचे 

जरी मी गुंफले

पाय माझा मोकळा

मी नाही गुंतले ।।२।।


हृदयी तव तेवते

शांत मी निरांजनापरी

धग तुज न लागो

पेटुनि स्वाहेपरी ।।३।।


कुंठित श्वास माझे

केतकीच्या रे बनी

चंदनासम का झीजविशी वेड्या

काया तेजस्वी तनमनी ।।४।।


सुवर्ण चंपक देश माझा

गंधाळते दाही दिशी

दरवळून श्वास सारे 

जाहले मी आता रिती ।।५।।


साठवांच्या आठवांचे

डंख तुज दंशती रे

विसरून त्या स्मृतींना 

पसरून पंख तू झेप घे ।।६।।


मळभ दाटल्या भावनांना

आसवांनी तू झरु दे

आकाश मोकळे कर मनाचे 

उमलूनी पुन्हा फुलू दे ।।७।।


अनुरक्त अनुरागाचे

क्षणिक ते भांबावलेपण

सरले सारेच मागे

उत्फुल्ल प्रीतीचे ते क्षण ।।८।।


बहरले जीवनी माझ्या

काही न आता कमी

सहवासे तुझ्याच रे 

तृप्त मी तनमनी ।।९।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics