तो पाऊस
तो पाऊस
पहिला पाऊस
बरसला कसा अवचित
तनु रोमांचित
शहारली
आला पाऊस
बरसत मेघांच्या पालखीतून
मुसळधार बरसून
धरणीवरी
अकस्मात तू
असा आला झडकरी
मी घरी
जाताना
एकटीच मी
भिजले तव धारांनी
जशी अवनी
चिंब
साथ साजणाची
पहिल्या पावसात हवी
प्रीत पालवी
फुलावी

