STORYMIRROR

swarali limbkar

Inspirational

3.5  

swarali limbkar

Inspirational

ती

ती

1 min
2.9K


दुर्गा, भवानी, सरस्वती

ह्याना पूजणारी आमची संस्कृती

माताही जिथे वंदनीय

परस्त्री असे आदरणीय

प्रेम,त्याग,कर्तृत्वाची आकृती

स्त्री ही तर निसर्गाचीच प्रतिकृती

खऱ्या अर्थाने करूया आदर स्त्रीचा

नका बनवू तिला विषय विनोदाचा

नोकरदार, गृहिणी,

सखी आमुची हिरकणी

कर्तृत्वा तिच्या आकाशही अपुरे

खरंच ती आहे सदगुणी

नसेल होत आता ती घोड्यावर स्वार

पण गर्दीत चढण्यासाठी रोजच ट्रेन वॉर

जन्म देण्या ती,शिकवण्या ती

बालपणातील सखी ती

तारुण्याची साक्षीदार ती

म्हातारपणीची काठीही ती

सृजनतेची मूर्ति ही

देई परिवारा आकार

जबाबदाऱ्या सांभाळताना

द्या तिला आधार





Rate this content
Log in

More marathi poem from swarali limbkar

Similar marathi poem from Inspirational