STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance

4  

sarika k Aiwale

Romance

ती पहाट

ती पहाट

1 min
240

रात्र वैरी अन सचिंती मनी 

पहाट दारी अलगद आली 

भान प्रियाचे हरले क्षणी 

उजळूनी दान देऊनी गेली 


किणकीण लाली ल्याली 

गुंजन मनी भरुनी राहिली

क्षण उजळत्या प्रहरातली

पहाट मनास स्पर्शुनी गेली 


क्षण ते ओझरता मनास 

आस जीवा सुनी लागली 

जीव ओवळूनी टाकत 

भाव अंतरीचे दावुनी गेली 


आसक्त प्रभाती ती लाली 

प्रभा तयाची भाळूनी गेली 

सरता रात्र गर्भात पहाट 

कानी आशा बोलुनी गेली 


मिटल्या पापणीतली आस 

नजरेत भान उरुनी जगली 

कातर काहुरी ती क्षणास 

ती पहाट मनात उरुनी राहिली 


हा क्षण ठेव मनी जपूनी 

हलकेच मनाला जाग आली 

भाळूनी गेला तो स्पर्श उरी

पहाट जीव ओवळूनी गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance