STORYMIRROR

Sakshi Iwale

Abstract Others

4  

Sakshi Iwale

Abstract Others

ती माझी आजी होती

ती माझी आजी होती

1 min
340

दारी होतं वृंदावन आजूबाजूला उंबर
वाटे नेहमी आनंद ते होतं तिचं सासर 

जग शोधायला गरज नव्हती कुणाची
कारण सगळं जगच तिच्या कुशीत विसावलं होतं
डोईवरून मायेने फिरवलेला हात अन् 
गोष्ट सांगताना चेहऱ्यावर उमटलेले हसू
कित्ती कित्ती काही सामावलं होतं..
त्या एका हसण्यात

आठवणींचा ससेमिरा असा मागे लागलेला
आणि लक्षात आलं डोळ्यातील पाणी पुसताना 
अख्खा दिवसच मागे सरलेला 
राधा कृष्णाच्या गोष्टी आता अचानक आठवल्या
तिने सांगितलेल्या

विठ्ठलाच्या पायाशी वाहिलेल्या मंजुळेने मात्र आजही साक्ष दिली
तिने सांगितलेली त्या पांडुरंगाची कथा क्षणार्धात आठवली
आणि त्या पाठोपाठ मऊ पदराच्या गाठीत बांधलेल्या त्याच्या प्रसादाची चव आजही जिभेवर रेंगाळली..  

आल्या गेल्याची खबरबात होती तिला
पण तिची खबरबात मात्र अंगणातल्या तुळशीलाच 
रांगोळी चे दोन ठिपके अन् भरभरून पसरलेले रंग
हे तिच करू शकत होती..
कारण ती माझी आजी होती..






Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract