मनात दरवळलेला पारिजात
मनात दरवळलेला पारिजात
1 min
13
सहज नजर गेली अंगणी
फुलांनी लगडलेलं ते झाड दिसलं
त्याचा सडा पडलेला खाली
त्याला पाहताच भान हरपलं
त्याचा सुगंध दरवळला मनी
केशरी देठ अन् नाजूक कळी
सूर्यप्रकाशात चमकणारी
दागिन्यांची नक्षीच जणू ती
कुठल्याही फुलाला लाजवेल
इतका नाजूकपणा त्यात
केसात माळल्या वर मात्र
मनात भरला त्याचा साज
