STORYMIRROR

Shirish Padmakar Deshmukh Deshmukh

Romance

2  

Shirish Padmakar Deshmukh Deshmukh

Romance

ती ही.

ती ही.

1 min
3.0K


ती ही करावयाचे

तेच करून गेली

उसवून जखमा साऱ्या

वेदना भरून गेली.

मज वाटले या वाटा

फुलवतील जगणे माझे

मी मागता फुले तीच

ती काटे पसरून गेली.

डोळ्यांत तीच होती

काठोकाठ मी भरलेली

स्वप्नाळल्या पापण्यांत

ती पाणी भरून गेली.

रडू कसा भांडू कुणाशी

नव्हतेच माझे कुणी कधी

पुन्हा कुणाशी बोलण्याचीही

इच्छाच मरून गेली.

सांज होता जीव उजळता

उगाच रेंगाळते मनी

पुन्हा या वेड्या मनाला सखे

का तू स्मरून गेली?

 

शिरीष पद्माकर देशमुख

मु.मंगरूळ ता.मंठा जि.जालना 

मो. 7588703716 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance