STORYMIRROR

Shirish Padmakar Deshmukh Deshmukh

Others

3  

Shirish Padmakar Deshmukh Deshmukh

Others

माझा शिवाजी राजा

माझा शिवाजी राजा

1 min
14K


चंदन गंधी पहाट शिवाजी

सूर्योदयाची वाट शिवाजी

सृष्टीचा या थाट शिवाजी

सह्याद्रीचा घाट शिवाजी

शिवसागराची लाट शिवाजी

भव्यदिव्य विराट शिवाजी

अपूर्व अन् अफाट शिवाजी

ताठ मानेचा अभिमान शिवाजी

धमन्यात उसळणारा स्वाभिमान शिवाजी

विधी आणि विधान शिवाजी

या मातीचा सन्मान शिवाजी

इथली धरती अस्मान शिवाजी

शौर्याचे गुणगान शिवाजी

अमुचा जीव अन् प्राण शिवाजी

अवघा हिंदूस्थान शिवाजी

जगण्याची अमुच्या रीत शिवाजी

एकच आमुची प्रीत शिवाजी

श्वासलयींचेे संगीत शिवाजी

देशधर्माचे हित शिवाजी

प्राणपणाची जीत
शिवाजी

डोळ्यांत या सदोदित शिवाजी

या काळजात टवटवीत
शिवाजी

या संस्कृतीचे संचित शिवाजी

तुझा न् माझा श्वास शिवाजी

या विश्वाचा विश्वास शिवाजी

धैर्याचा अनुप्रास शिवाजी

ध्यान शिवाजी ध्यास शिवाजी

गनिमांसाठी त्रास शिवाजी

भुकेल्या ओठी दे घास शिवाजी

उन्नती न् विकास शिवाजी

मनात माझ्या खास शिवाजी

शायिस्ताची बोटे छाटून
लावी रक्ताची धार शिवाजी

अफजलाचा काढी कोथळा
वाघनख्यांचा वार शिवाजी

राज राय प्रताप पुरंदर
गडकिल्ल्यांची बहार शिवाजी

औरंगजेबा पाजून पाणी
आग्र्यातूनही पसार शिवाजी..

मुघलांच्या राकट छातीतून
आरपार तलवार शिवाजी

गोरगरीबा छळणाऱ्या
खल दुष्टांचा संहार शिवाजी

समतेचा विचार शिवाजी

दुबळ्यांचा आधार शिवाजी

माणूसपण जो विझू न देई

मानवतेचा अंगार शिवाजी..

या मातीचा टीळा आभाळी
गोंदण्याचा अधिकार शिवाजी

जगणे लढणे पेरून गेला
स्वातंत्र्याचा संस्कार शिवाजी

स्वराज्याचा सुसंस्कार शिवाजी!

 

 


Rate this content
Log in