ती आणि तो
ती आणि तो


ती सारखं सारखं
आभाळाकडे बघायची
त्याला खुणवायची
तो ढगाआड लपायचा
ती वाकुल्या दाखवायची
ती ये रे ये रे म्हणायची
तो नाही म्हणायचा
ती त्याला पैसे दाखवायची
तो तिच्या गालावर
थेंबांनी स्पर्श करायचा
ती रागवायची
तो हसायचा
ती संताप करायची
तो लपायचा
ती रूसायची
तो गारवा द्यायचा
ती वाऱ्याशी खेळायची
तो शिळ घालायचा
ती दूर पळायची
तो तिला छेडायचा
ती गाणं म्हणायची
तो तिला कवेत घ्यायचा
तिचा लडिवाळा पाहून
मुसळधार यायचा
ती चिंब चिंब भिजायची
तो शांत व्हायचा
ती सरींना मिठीत घ्यायची
तो लाजायचा
ती आडोसा घ्यायची
तो लपून बघायचा
तिचं भिजलेलं रूप पाहून
काळोखात शिरायचा