STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

तिची आठवण.!(१८)

तिची आठवण.!(१८)

1 min
315

तिची आठवण आली

काय त्यात विशेष...?

मीच मला प्रश्न केला...!

उत्तर ही

मीच दिले

लेका आठवण येणारच की...!

उपद्व्याप ते तुझे

त्याला दुसरे कोण

काय करणार....?

शांत बसलो

आणि मनाशीच म्हंटले

आता

काय उपयोग त्याचा...?

तसे

मन सावरून म्हणाले

पहिले प्रेम बाबा

असे व्हायचेच...!

तेंव्हा

जून ते सोन का म्हणतात

ते कळल

आणि

जुन्या वाटेवर

पुन्हा पाऊल वळलं....

म्हंटल

मागे वळून

पाऊल खुणा आहेत की

पुसून गेल्यात ते पहावं

पुन्हा एकदा

जुन्या वाटेवर

अलगद चालावं

प्रेम प्रेम काय म्हणतात

ते पुन्हा एकदा जाणावं....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance