STORYMIRROR

Sachin B.Chavan

Romance

4.5  

Sachin B.Chavan

Romance

थोडं तरी बोल.

थोडं तरी बोल.

1 min
14.1K


  थोडं तरी बोल पोरी कोडं ते सोड,

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

     कँटीनच्या चकरा, होतात सतरा,

     कधी कधी वाटतयं झालो मी बकरा..

     कशी आवडीन खातीया चहासंग रोल,

     प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

थोडं तरी बोल पोरी कोडं ते सोड,

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल

     शाँपिंगच वेड, पैस हाय थोडं,

     रोजचं मागते खायाला गोडं..

     खाऊ खाऊन फुगली झालीया गोल,

     प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

थोडं तरी बोल पोरी कोडं ते सोड,

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

     पायाचं नखं ते डोक्याच केस,

     सगळच अगदी मँचिंग नेस..

 &

nbsp;   किती ग करतीया माझ्या संग झोल,

     प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

थोडं तरी बोल पोरी कोडं ते सोड,

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

     झाल ते पुरं, बोलतो खरं,

     तुझ्याचपायी जीव हा झुर..

     पैशान तोलू नको प्रेमाचं मोल

     प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

थोडं तरी बोल पोरी कोडं ते सोड,

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल

     अंग मधाळं, व्हटं रसाळं,

     कधी ग व्हणार आपुला मेळ.

     आता तरी दार पोरी मनाचं खोल,

     प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

थोडं तरी बोल पोरी कोडं ते सोड,

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.

प्रेम हाय का नाही तेवढं त बोल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance