STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

1  

Sangam Pipe Line Wala

Romance

थोडा दे धीर

थोडा दे धीर

1 min
447

तुझ्या प्रेमात झालो मी गुन्हेगार 

लागली फाशी तू थोडा दे धीर


पसंत ना मला आकाशातली परी 

लाखात एक तू सगळ्यात भारी 

तुझी अदा अशी कमानीतला तीर


नजर तुझी राणी जशी तलवार 

जाईल जीव मिळेना साक्षीदार 

खाऊ दे मला तुझ्या प्रेमात खीर


तुझे तिखट बोल जशी बंदूक 

उघड मनातल्या प्रेमाचा संदूक 

सांग तुझ्यासाठी हारले किती वीर


खतरनाक तुझ्या प्रेमाचं जाळं 

संगमचं जीवन प्रेमात होईल काळं 

तुझ्या प्रेमाची तहान पाज मला नीर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance