ते एक जीवनदायी झाड
ते एक जीवनदायी झाड
ते एक जीवनदायी झाड
त्याच्यावर फळांची माळ
शाल पांघरली पानांची
सावली जणू माया आईची
शुद्धीकरण हवेचे करते
मधुर फळाने पोट भरते
उंचच उंच - लांबच लांब
याने बनतात घराचे खांब
खांब हा देतो आधार
झाडांवर जगाचे भार
झाड आहे आपला सखा
कृपया त्याला कापू नका
