मी एक बाई.....
मी एक बाई.....
आहे मी एक बाई
कधीतरी होईल आई
घ्यायची मला घराची काळजी
मी थोडी हसरी, थोडी लाज़री
आहे मी एक बाई
एका भावाची ताई
रक्षाबंधन, भाऊबीजेला ओवाळते
स्वतः च्या दुःखात स्वतःच सावरते
आहे मी एक बाई होईल कधीतरी सून
पण मिरवायचं नाही मला नवऱ्याचे नाव लावत
लग्न झाल्यावरही वडिलांच्या नावात,
राहील मी माझे प्रतिबिंब पाहत
हे करू नकोस, ते करू नकोस
कारण आहेस तू एक बाई
तू आहेस कोण हे मला सांगणारा
तुला हे बोलण्याचा काहिच अधिकार नाही
जरी असली भी एक बाई
जगण्याचा मला पूर्ण हक्क
लक्ष्मीबाई, अहिल्याबाई याही होत्याच बाई
पण यांच्या कामगिरी मुळेच लोक राहतात अजूनही थक
कुमकुवत नको म्हणूस
आहेस तू हैवान,
गरज पडली तर हिच भोळी बाई
घेईल तुझे प्राण
आहे मी एक बाई
सगळ सहन करेल
पण हिमतीवर येऊ नका
माणसापेक्षा माझं पारडं जास्त भरेल
हो, आहे मी एक बाई
लक्षात ठेवा, मी ही गोष्ट सांगेल
देशासाठी काही तरी करेल आणि
स्वतःला बाई नाही, तर या देशाची मुलगी म्हणेल
