STORYMIRROR

Shobha Wagle

Romance

3  

Shobha Wagle

Romance

स्वर्ग सुख

स्वर्ग सुख

1 min
590

स्वर्ग सुख संसारात घेण्यास

सुत्रे सुखी संसाराची जपावी

पती-पत्नी ही दोन नाती मात्र

एकमेकांच्या विश्वासाची असावी.


एकमेकांना समजून घेणे

परस्परांच्या मनाला जपणे

दोन्ही चाकानी तोल सावरणे

राग -रूसवा लगेच विसरणे.


एकमेकांची काळजी घेणे

एकमेकांची नाती जपणे

संसार रथ दोघांनी हाकावा

कमी-जास्त भार तो सावरणे.


माझं तुझं कधी न करणे

दोघांच आपलं समजणे

सुख दुःखात साथ तयांची

एकमेकांना सतत असणे.


सूत्रे सुखी संसाराची असतात

पती -पत्नी दोघांच्या हाती

वर चढाव आले संसारात

तर दोघांनी घट्ट ठेवावी नाती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance