STORYMIRROR

Subhash Patil

Romance

3  

Subhash Patil

Romance

स्वप्नसुंदरी

स्वप्नसुंदरी

1 min
11.7K

माझ्या स्वप्नांतल्या स्वप्न सुंदरी,

माझ्यासाठी एव्हढं करशील का?

रोज स्वप्नात येउन माझ्या,

अशीच छळत राहशील का?


हळूच कानात येउन माझ्या,

अशीच फुंकर घालशील का?

रोज कोमल स्पर्शांनी तुझ्या,

अशीच साखरझोप मोडशील का?


चंद्रासोबत चांदणी सारखी,

माझ्या सोबत राहशील का?

जन्मभर सोबत राहण्याचं,

वचन मला देशील का?


स्वप्नांतलं जग सोडून,

सत्त्यात कधी येशील का?

विश्वास कुणाचा बसत नाही,

सर्व जगाला तु सांगशील का?


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Romance