रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
67
दादाच्या अंगणातली पालवी
आज पून्हा टवटवली!
ताईच्या निर्मळ पावलांनी
पुनव आज पुन्हा बहरली!!
गंध कुंकवाचा भाळी लेपून
ताई दादाला ओवाळी!
क्षणभर नजर पापणीत थिजवुन
पाणावलेल्या सागरात प्रेमाची उसळी!!
दादाला राखी बांधतांना
ताईच्या विश्वासानं मारल्या गाठी!
एकमेकांना गोडवा भरवून
सोनेरी नात्यात चांदीच्या गाठी!!
